ST Corporation rent hike:राज्यामध्ये नुकत्याच निवडणुका पार पाडले आहेत पण निवडणुका होण्याअगोदर महाविकास आघाडी व महायुती कडून राज्यातील जनतेला आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे आश्वासन दिले गेले होते परंतु आता महायुती सरकार सत्तेत आले व लगेच आता सर्वसामान्य लोकांना मोठ झटका बसणार आहे असे चित्र सध्या दिसू लागले आहे कारण की राज्यातील एसटी महामंडळ कडून तब्बल 18% भाडेवाढ केली जाणार आहे असे सांगण्यात येत आहे.
एसटी महामंडळाचा नेमका प्रस्ताव काय? ते खालील प्रमाणे आपण पाह !
आत्ताच हाती आलेल्या माहितीप्रमाणे येणाऱ्या महायुती सरकारच्या काळात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना आता मोठा आर्थिक फटका बसणार आहे कारण की एसटी महामंडळ यांच्याकडून तब्बल 18% भाडे वाढ करण्याचा प्रस्ताव दिला गेला आहे.
मोठी बातमी महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करणार
वारंवार महागाई होतं असल्यामुळे एसटी महामंडळाने देखील आता आपल्या तिकीट दरात 18% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे हा प्रस्ताव निवडणुकीच्या अगोदरच पाठवला गेला असल्याचा देखील सांगण्यात आला आहे.
मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता.
एसटीला दर दिवस होत आहे 15 कोटींचा तोटा
महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबई-पुणे प्रवास तब्बल 50 ते 60 रुपये महाग होण्याची शक्यता आहे. याआधी 2021 साली शेवटची भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर एसटी महामंडळाने कोणतीही भाडेवाढ केलेली नाही.
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळ तोट्यात आहे. मिळालेल्या माहितीनुसार महामंडळाला प्रति दिवस 15 कोटींच्या आसपास तोटा होतो. त्यामुळे ही तूट भरून काढायची असल्यास तसेच एसटी महामंडळाच्या स्थितीत सुधारणा करायची असल्यास ही भाडेवाढ गरजेची असल्याचं, म्हटलं जातंय.
भाडेवाढ करण्याचे मुख्य कारण हे आहे
1) कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन
2) वाढता इंधन दर
3) सुट्ट्या भागांची वाढती किंमत
4) टायर आणि लुब्रिकंट यांचे वाढते दर