Ration Card New Apply:आपले रेशनकार्ड हरवले असेल तर चिंता करण्याची गरज नाही.अन्न धान्य वितरण विभागाने नवीन शिधापत्रिका काढणे, त्यात बदल, दुरुस्त्या यासाठी स्वतंत्र वेबसाइट सुरू केली असून, त्यावर अर्ज केला की, महिनाभराच्या आत नवीन ई- शिधापत्रिका मिळते.
राज्य शासनाच्या अन्न व नागरी विभागातर्फे अंत्योदय, प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना धान्य, आरोग्य सेवा, आनंदाचा शिधा, साडी, पिशवी अशा सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ दिला जातो.
तुलनेत एनपीएच आणि पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना काहीच मिळत नाही. पण, आता महिनाभरापूर्वी शासनाने या दोन्ही शिधापत्रिकांवरील नागरिकांनाही आरोग्य सेवांमध्ये सामावून घेतले आहे.
सोने खरेदी करणाऱ्यांसाठी लॉटरी,आठवडाभरात सोने इतकी मोठी घसरण
त्यामुळे कधी नव्हे ते या शिशापविकांना मोठे महत्त आले थारे शिधापत्रिका म्हटले की, विविध नोंदींचे कॉलम असलेली छोटी पुस्तिका असेच त्याचे चित्र डोळ्यासमोर येते.
पण, आता त्यामध्येही शासनाने सुधारणा केली आहे. नागरिकांना कोठेही जायचे असेल तर ती पग्निक्ता नाद्यात्ती गरत्न नाही, किंवा शिधापत्रिका हरवली तर फार काळजी करत बसण्याची गरज नाही. शासनाच्या वेबसाईटवर नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज केला की, पुढे महिनाभरात ई-शिधापत्रिका तयार होने
येथे करावा ऑनलाइन अर्ज
शिधापत्रिका हरवली असेल
तर शासनाच्या mahagov किवा foodgov या वेबसाइटला भेट द्या. तिथे शिधापत्रिकेसंबंधीच्या लिंकवर क्लिक केल्यास पब्लिक लॉगीनमध्ये कुटुंबातील कर्ती महिला व अन्य सदस्यांची माहिती भरून अर्ज सबमीट करायचा.
हा अर्ज तहसील कार्यालयाकडे शहरी असेल तर शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाकडे जातो. त्यांच्याकडून शिधापत्रिकेला मान्यता दिली जाते.
जिल्ह्यात ९ लाखांवर रेशन कार्डधारक
जिल्ह्यात अंत्योदय, प्राधान्य, गटातील ५ लाख ८७ हजार ६०६ शिधापत्रिका आहेत. एनपीएच आणि पांढऱ्या शिधापत्रिकांची संख्या ३ लाख ४० हजार ६३४ इतकी आहे.