मोठी बातमी महाराष्ट्राची दशकभरात मोठी पीछेहाट ! गुजरातची आघाडी,पंतप्रधान कार्यालयाचा अहवाल

Maharashtra News:राज्याच्या स्थापनेपासून २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राने आर्थिक क्षेत्रात आघाडी घेतली असली, तरी गेल्या दशकभरात राज्याची आर्थिक आघाडीवर काहीशी घट झाल्याचा निष्कर्ष पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने काढला आहे.

राष्ट्रीय पातळीवर सकल राज्य उत्पन्नाच्या वाट्यात महाराष्ट्राची १५ टक्क्यांवरून १३ टक्के अशी जवळपास दोन टक्क्यांनी घट झाली आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने १९६०-६१ ते २०२३-२४ या कालावधीतील राज्यांच्या आर्थिक कामगिरीचा अहवाल नुकताच सादर केला.

आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सन्याल आणि सहसंचालिका आकांक्षा पांडे यांनी राज्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. राज्याच्या स्थापनेपासून २०२३-२४ या आर्थिक वर्षापर्यंत महाराष्ट्राची आर्थिक कामगिरी ही देशातील अन्य राज्यांपेक्षा सरस ठरली आहे.

आर्थिक उलाढालींमध्ये सर्वाधिक वाटा हा महाराष्ट्राचा राहिला आहे. आर्थिक आघाडीवर राज्याने चांगली प्रगती केली. सकल राज्य उत्पन्नात महाराष्ट्र कायमच आघाडीवरील राज्य ठरले. फक्त गेल्या दशकभरात आर्थिक आघाडीवर काहीशी घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आला आहे.

1 नोव्हेंबर 2024 पासून मोफत रेशनच्या नियमात मोठा बदल! नवीन परिस्थिती आणि फायदे जाणून घ्या

सध्या राष्ट्रीय पातळीवरील सकल राज्य उत्पन्नात (जीडीपी) महाराष्ट्राचा वाटा हा १३.०३ टक्के आहे.

• १९८० च्या दशकात हा वाटा १४.२ टक्के, १९९०च्या दशकात १४.६ टक्के, २००० च्या दशकात १४ टक्के

अहवालातील निष्कर्ष ?

देशाच्या सकल राज्य उत्पन्नात महाराष्ट्राने देशात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती.

• २०१० मध्ये १५.२ टक्के, २०२० मध्ये १३ टक्के तर २०२३ मध्ये हा वाटा १३.३ टक्क्यांवर गेला आहे.

• २०१० मध्ये १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राची पीछेहाट होऊन हा वाटा आता १३ टक्क्यांपर्यंत घटला आहे.

गुजरातची आघाडी

सकल राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नात गुजरातने विशेष प्रगती केली आहे. सकल राज्य उत्पन्नात गुजरातचा वाटा ८ टक्क्यांपेक्षा अधिक झाला आहे.

दरडोई उत्पन्नात गुजरातने महाराष्ट्राला मागे टाकले आहे. दरोडोई उत्पन्नाचा विचार केल्यास तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, तमिळनाडू, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहेत.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews