मोठी बातमी 13 जिल्ह्यात मुसळधार पाऊसाची शक्यता! हवामान विभागाचा अंदाज

IMD Rain Alert Today:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा काळ पुन्हा एकदा चिंतेचा ठरू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) नुकताच दिवाळीच्या काळात राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः १ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निमित्ताने शेतकरी बांधवांसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

सध्या राज्यातील हवामान अत्यंत विचित्र स्वरूपाचे आहे. सकाळच्या वेळी गारवा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र कडक उन्हाचा तडाखा बसत आहे. सायंकाळी पुन्हा अनेक भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः रब्बी हंगामाच्या पेरणीच्या काळात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तीन प्रमुख विभागांतील जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे:

Jio ची ग्राहकांना मोठी भेट ! एका वर्षभराचा रिचार्ज मोफत, नवीन प्लॅन केला लॉन्च

कोकण विभाग:

रायगड

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

मध्य महाराष्ट्र:

पुणे

सातारा

सांगली

सोलापूर

कोल्हापूर

अहिल्यानगर

मराठवाडा:

लातूर

धाराशिव

बीड

नांदेड

या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मागील काळातील नुकसान

यंदाच्या वर्षी मान्सूननंतरच्या काळात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews