राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) लागू असणाऱ्या सभासद/सेवानिवृत्त/NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी अर्जित रजा रोखीकरणासंदर्भात वित्त विभागाने महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित केले आहे.
अर्जित रजा रोखीकरणाचा आदेश
राजीनामा देणे, नोकरी सोडणे किंवा निधन झाल्यास, महाराष्ट्र नागरी सेवा रजा सुधारणा नियम 2016 अंतर्गत अर्जित रजा रोखीकरणाच्या अनुज्ञेयतेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाने निर्णय घेतला आहे. अवर सचिव अनिता लाड यांच्या मार्फत, राज्यातील सर्व राज्य अभिलेख देखभाल, अभिकरण संचालनालय लेखा व कोषागारे यांना सदर शासन परिपत्रक सादर करण्यात आले आहे.
विधानसभा निवडणूक भाजपला मिळणार फक्त एवढ्या जागा ! धक्कादायक सर्वे आला समोर
निवृत्तीवेतन योजनेचे स्पष्टीकरण
शासनाने 31 ऑक्टोबर 2005 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील परिच्छेद पाच (ब) मध्ये स्पष्ट केले आहे की, 01 नोव्हेंबर 2005 पासून राज्य शासन सेवेमध्ये नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू होईल. सध्याच्या निवृत्तीवेतन योजना, जसे की महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशिकरण नियम 1984, आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू राहणार नाहीत.
रजा नियमांचे स्पष्टीकरण
01 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 लागू होणार नाहीत असा कोणताही आदेश निर्गमित केलेला नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981 लागू राहतील.
शासन परिपत्रकाचे अधिकृत विवरण
अवर सचिव वित्त विभाग अनिता लाड यांनी दिनांक 14 जून 2023 रोजी सविस्तर शासन परिपत्रक निर्गमित केले आहे, ज्यामध्ये वरील सर्व माहिती दिलेली आहे.