क्रेडिट स्कोर खराब आहे? सिबिल स्कोर सुधारण्यासाठी वापरावेत हे प्रभावी उपाय!

Credit Score : जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब झाला असेल, तर त्याचा परिणाम तुमच्या सिबिल स्कोरवर होतो. कर्ज घेण्यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असावा लागतो. तुमचा क्रेडिट स्कोर जितका चांगला असेल, तितकी तुमची आर्थिक स्थिती चांगली मानली जाते. पण कधी कधी काही कारणांमुळे क्रेडिट स्कोर खराब होतो, ज्यामुळे सिबिल स्कोरही प्रभावित होतो. तुमचा सिबिल स्कोर सुधारण्यासाठी काही टिप्स आहेत.

वेळेवर लोनचे पेमेंट करा

वेळेवर कर्जाचे पैसे फेडा तुमचे कर्ज, क्रेडिट कार्ड बिल, किंवा इतर हप्त्यांचे पैसे वेळेवर भरणे खूप महत्त्वाचे आहे. पैसे उशिरा भरल्यास तुमच्या क्रेडिट स्कोरवर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमच्या पेमेंटचा रेकॉर्ड चांगला ठेवा जर तुम्ही वेळेवर आणि नियमितपणे पैसे भरले, तर तुमचा क्रेडिट स्कोर सुधारेल. त्यामुळे आर्थिक नियोजनासाठी वेळेवर पेमेंट करणे फायदेशीर ठरते.

क्रेडीट युज कमी ठेवा

तुमच्या क्रेडिट कार्डची एकूण मर्यादा आणि त्यावर वापरण्यात आलेली रक्कम म्हणजे क्रेडिट युज. तुम्ही क्रेडिट लिमिटचे फक्त ३०% वापरण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट लिमिट १०,००० रुपये असेल, तर तुम्ही तीन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करू नका.

जुना क्रेडीट कार्ड बंद करु नका

तुमच्या क्रेडिट कार्डची एकूण मर्यादा आणि त्यावर वापरण्यात आलेली रक्कम म्हणजे क्रेडिट युज. तुम्ही क्रेडिट लिमिटचे फक्त ३०% वापरण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, जर तुमची क्रेडिट लिमिट १०,००० रुपये असेल, तर तुम्ही तीन हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च करू नका.

नवीन कर्ज घेताना काळजी घ्या

जुने क्रेडिट कार्ड बंद करू नका. तुमचा क्रेडीट इतिहास CIBIL स्कोअरवर प्रभाव टाकतो. जास्त जुना क्रेडीट इतिहास असलेला व्यक्तीचा CIBIL स्कोर चांगला असतो. त्यामुळे जर तुमच्याकडे वापरात नसलेले जुने क्रेडिट कार्ड असेल, तर ते बंद करणे टाळा.

क्रेडीट रिपोर्ट तपासा

तुमच्या क्रेडीट रिपोर्टमध्ये कोणत्याही चुका नाहीत याची खात्री करण्यासाठी दरवर्षी तो तपासा. जर काही चुका आढळल्या, तर त्या लवकर दुरुस्त करा.पेटीएम मोबाइल वॉलेट ॲपने सिबिल स्कोअर तपासण्याची सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही तुमचा क्रेडीट रिपोर्ट मोफत पाहू शकता आणि सक्रीय क्रेडिट कार्ड तसेच कर्ज खात्यांचा तपशील देखील पाहू शकता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Close Visit agrinews