Maharashtra Vidhansabha CM Minister Elected 2024: मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना पसंती. संभाव्य मंत्रीमंडळाची यादी आली समोर*
विधानसभा २०२४
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
आज दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तेब केला जाईल.
या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 2100/- रुपये (6 वा हप्ता); तुमचे नाव तपासा
महायुतीचे नेते आज दिल्लीत जाणार असल्याने उद्याच नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नव्या सरकारमध्ये असणार आहे.
भाजप गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी
राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजीपाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड, यांची नावे समोर आली आहे.
शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची यादी
एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोडभरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे यांचा समावेश आहे.
*अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी
अजिते पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्रम. अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांचा समावेश आहे.