Assembly Election Voter Notice:विधानसभा निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी, मतदान केंद्रावर गैरसोय होणार नाही, याची जबाबदारी त्या-त्या गावचे • तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील व तेथील शासन नियुक्त कर्मचाऱ्यांची असेल. मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही आणि १०० मीटरच्या आत मोबाईल बंदी असेल. चिन्ह असलेली चिठ्ठी मतदाराला दिल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर क्रमांक लिहिला आहे का, पुरेसे फर्निचर, लाईट, पाणी, प्रसाधनगृह, आवश्यक त्या ठिकाणी मंडपाची सोय करावी लागणार आहे. याशिवाय मतदान केंद्रावर जारचे पाणी पुरवण्यात यावे, साहित्याची देवाण-घेवाण करण्यासाठी ज्या ग्रामसेवकांची नेमणूक आहे, त्यांनी या कामाबरोबरच स्वतःच्या गावातही जबाबदारी पार पाडायची आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर अंतरापर्यंत यात्रा, उरुस, भजन, कीर्तन, प्रवचन ठेवता येणार नाही. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार बंद होऊन बॅनर्स,
आयोगाच्या सूचना
मतदानाच्या दिवशी आठवडा
बाजार बंद राहतील
मतदान केंद्रावर वीज, पाणी, स्वच्छतागृह, आवश्यक तेथे मंडप उभारावे
१०० मीटरच्या आत मोबाईल नेता येणार नाही
केंद्रे ७० टक्के वेबकास्टिंगने
जोडावी लागणार
मतदान केंद्रावरील सर्व सोय
ग्रामसेवक, तलाठी करतील
अनुचित प्रकार घडल्यास
गंभीर दखल घेतली जाणार
• १२ पुराव्यांपैकी एक पुरावा घेऊनच मतदानास यावे
मोबाईलमधील पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही
दिव्यांग व ८० वर्षांवरील वयोवृद्धांच्या सोईसाठी वाहन व्यवस्था
• चिन्ह असलेली चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार
पोस्टर्स काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान केंद्रे ७० टक्के वेबकास्ट केली गेली आहेत.
त्यामुळे सर्व प्रकार कॅमेऱ्यांमध्ये कैद होत आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर मेडिकल किट आशा सेविकांकडे देण्यात येईल.
१०० मीटरच्या आत मोबाईल घेऊन कोणालाही प्रवेश करता येणार नाही, अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
चिन्हाची चिठ्ठी दिल्यास गुन्हा दाखल होणार
• मतदारासाठी सर्वसाधारण सूचना
१. मतदानाची तारीख आणि वेळ दिनांक २०/११/२०२४ रोजी सकाळी ७.०० वा ते सायंकाळी ६.०० पर्यंत.
२. मतदान केंद्रावर तसेच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल / इलेक्ट्रॉनिक गॅझेट नेण्यास बंदी आहे. या बाबत मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश दिलेले आहेत. त्याचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहितेचे कलम २२३ अन्वये कारवाई केली जाईल.
३. मतदार स्वतःचा मतदार यादीतील अनुक्रमांक Voter helpline App व्दारे किंवा Voters eci.gov.in या साईटवर जाऊन किंवा मतदार सहायता क्रमांक १९५० वर मतदान कार्ड नंबरवरुन SMS करुन शोधु शकतात.
४. मतदारांनी मतदानासाठी सोबत येतांना मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) अथवा मा. निवडणुक आयोगाचे मतदान मान्यता दिलेल्या १२ ओळखपत्रापैकी एक मुळ ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. Xerox चालणार नाही.
५. मतदार माहिती चिड्डी (VIS) ओळखपत्र म्हणुन वापरता येणार नाही ती फक्त मतदारांना मतदान केंद्रावर मतदार यादीतील अनुक्रमांक माहिती व्हावी म्हणुन देण्यात आलेली आहे.
६. मतदान केंद्राबाहेर मतदारांना मदत करणेसाठी मतदार सहायता केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी BLO मतदारांना मतदार यादीतील अनुक्रमांक शोधण्यासाठी मदत करतील.
७. गरोदर महीला, दिव्यांग मतदार, स्तनदा माता, जेष्ठ नागरिक यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही त्यांना रांगेत उभे न करता प्राधान्याने मतदान करता येईल.
विधानसभा निवडणूक महत्त्वाची माहिती येथे क्लिक करून पहा